छत्रपती संभाजीनगर येथे पाडसवान कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नातेवाईकांनी सिडको पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. संभाजी कॉलनीमध्ये निमोणे कुटुंबाने पाडसवान कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रमोद निमोणे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे आई-वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आरोपींवर मोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.