नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बैद्यनाथ पंडित नामक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या जागेवरून मराठी कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. 'तुम्ही बाहेरचे लोक आहात, आम्ही तुम्हाला मारून हाकलून देऊ', अशी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले. मारहाणीत पत्नीचे मंगळसूत्र तुटले आणि आपल्याला अनेकदा चापट मारण्यात आल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.