शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "तिकडे जे सैनिक आणि नागरिक शहीद झाले, त्यांच्यापेक्षा जय शाह मोठे आहेत का? रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे वाहू शकते?" असा संतप्त सवाल ठाकरे यांनी विचारला. एका बाजूला 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली पाकिस्तानविरोधात भूमिका घेण्याचे बोलले जाते आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक फायद्यासाठी क्रिकेट खेळले जाते, असा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले.