Manoj Jarange's Warning | 'आम्ही आंदोलन तर करणारच', मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या पुनर्रचनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. "उपसमिती पुनर्रचना म्हणजे पोळ्याच्या दिवशी खांदेबदल" असे म्हणत, त्यांनी सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत नियोजित आंदोलन निश्चित होणार असल्याचे सांगितले. सरकार या उपसमितीची पुनर्रचना करून समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा दावा आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ