Nashik Bail Pola|निफाडमध्ये बैल पोळ्यात नर्तिकेचा नाच, थेट ग्रामपंचायत कार्यालयावर चढून अश्लील कृत्य

नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावातील बैल पोळा उत्सव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या उत्सवात बैलांसमोर नर्तकी नाचत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नर्तकी संगीताच्या तालावर नाचत थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर चढली. ग्रामीण नाशिकमध्ये हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, बैल पोळ्यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक सणादरम्यान घडलेल्या या अश्लील कृत्याबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

संबंधित व्हिडीओ