शिक्षकांच्या एका कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी, "मी हिमालयासारखा थंड नाही, तर सह्याद्रीची जिगर ठेवतो" अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षकांना अवाश्यक कामांमध्ये गुंतवले जात असल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. तसेच, विरोधकांवर होणाऱ्या आरोपांवरून त्यांनी भाजपवर पलटवार केला. आश्वासने देण्यापुरतीच हिंदी बोलता येते, असा टोला त्यांनी पंतप्रधानांनाही लगावला.