इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीवरील अतिक्रमण काढताना पोलीस आणि पारधी समाजामध्ये चकमक झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून गायरानाच्या ८ एकर जमिनीवर वास्तव्यास असलेल्या पारधी समाजाच्या कुटुंबांनी ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि महसूल प्रशासनाने लाठीचार्ज केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात पाच पारधी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.