मुंबईसह राज्यातील सात महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे, त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना 2017 प्रमाणेच असून, प्रत्येक प्रभागात सुमारे 45 ते 65 हजार लोकसंख्या असेल. मुंबईत एकूण २२७ जागांसाठी ही रचना निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत 122 जागांसाठी चार सदस्यांची प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी ही रचना करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.