डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार आंदोलन केले. यावेळी संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएचे अधिकारी राजेंद्र देवरे यांना घेराव घालत जाब विचारला. खड्ड्यांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि अधिकाऱ्याला कसेतरी बाहेर काढण्यात आले. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, याबद्दल मनसेने हा रोष व्यक्त केला.