संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत लिहिलेल्या पत्रावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "राऊत ट्रम्पलाही पत्र लिहितील," असा टोला शेलार यांनी लगावला. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे वाहू शकतात?" असा सवाल राऊत यांनी पत्राद्वारे विचारला होता.