हिंगोलीत महिनाभरापासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण झिरवाळांनी सोडवलं.उपोषण सोडवल्यानंतर आमदार संतोष बांगरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मिश्किल शब्दांत सल्ला दिला. 'तुमचा महिनाभराचा अभ्यास बुडाला आता चांगला अभ्यास करा आणि आमच्यासारखे आमदार व्हा', असं बांगर म्हणालेत. बांगर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला होता.