Sanjay Shirsat|सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं? शिरसाटांच्या वक्तव्यानंतर पुन्हा वाद होणार?

महायुती सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांची मालिका काही थांबता थांबत नाहीय.. वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या काही मंत्री अडचणीत सापडलेत. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या मंत्री संजय शिरसाटांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाटांनी म्हटलंय..मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं सुरुच आहे. सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू... सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय" असं त्यांनी म्हटलंय.. अकोल्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

संबंधित व्हिडीओ