Chh.Sambhajinagar मध्ये MIM ला आणखी एक धक्का, MIM नगरसेवक मेराज खान अटकेत | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून येतंय.. एमआयएमचे नगरसेवक मेराज खान यांनी निवडणूक शपथपत्रात बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर आलंय.. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान अटक केलीय.. तपासात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांचा वापर झाल्याचंही उघड झालं त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय.. याप्रकरणात एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय.. मेराज खान जलील खान यांनी महापालिका निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.. अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी स्वतःला फक्त दोन अपत्ये असल्याचे नमूद केले होते.. मात्र, पोलिस तपासात अहमद खान मेराज खान हे त्यांचे तिसरे अपत्य असल्याचं समोर आलंय.. हे सत्य लपवण्यासाठी मुलाचे नाव बदलून अहमद खान आणि वडिलांचं नाव मिनहाज खान असे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे..

संबंधित व्हिडीओ