धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका हा ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामामध्ये अडुसष्ठ टक्के क्षेत्रावरती ज्वारीची पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात झालेला समाधानकारक पाऊस आणि त्यामुळे पिकंही चांगली आली होती. पण लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि इतर कीटकजन्य रोग यामुळे ज्वारी पिकाला फटका बसतोय.