राज्यातल्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेची हिंगोलीतल्या आखाडा बाळापूर मधील रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना फरशीवर झोपायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर एनडीटीव्ही मराठीनं राज्यातील इतर रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेतला यावेळेस एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळवाडी आरोग्य केंद्रातही अशीच काहीशी धक्कादायक स्थिती समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजता या आरोग्य केंद्रात चाळीस महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली आहे मात्र महिलांना बेड उपलब्ध करून न देता त्यांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलंय. आरोग्य विभागाचा हा हलगर्जीपणा एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यातही कैद झालाय.