ईव्हीएम च्या तक्रारीवरून एकट्या पडलेल्या काँग्रेसची आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर महाविकास आघाडीनं ईव्हीएम वर खापर फोडलं मात्र आता ईव्हीएम विरोधातल्या लढाईत काँग्रेस एकटीच पडल्याचं दिसतंय. याचं कारण आधी शरद पवारांनी ईव्हीएम विरोधात कोर्टात धाव न घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता ओमर अब्दुल्ला यांनी देखील काँग्रेसचे कान टोचलेत काँग्रेसनं आता ईव्हीएम चं रडगाणं बंद करावं असा सल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दिलाय. याशिवाय जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रांवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नये असंही अब्दुल्ला म्हणतायत. त्यामुळे इंडिया आघाडीत ईव्हीएम च्या मुद्द्यावर काँग्रेस एकटी पडल्याचं चित्र दिसतंय.