विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतंय यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यालय देण्यात आली आहेत. पक्षफुटी नंतर पहिल्यांदाच ही स्वतंत्र कार्यालयं दिलेली आहेत. मागच्या वेळी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वेगवेगळी कार्यालय देण्यात आली नव्हती मात्र यावेळेला आता वेगवेगळी कार्यालयं देण्यात आलेली आहेत. एकीकडे भाजपचे विधिमंडळ पक्ष कार्यालय तर असेलच पण त्याबरोबरीनं राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी शरद पवार गट अशी ही कार्यालय पाहायला मिळतायत.