जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मातृभूमी मंडळाचा गणराया हा खान्देशाचा राजा म्हणून ओळखला जातो. यावर्षी या खान्देशाच्या राजाचं चोविसावं वर्ष असून मातृभूमी मंडळाच्या वतीनं खान्देशच्या राजाच्या, राजासाठी यंदा कर्नाटकामधील लक्ष्मी नृसिंह मंदिराचा देखावा सादर करण्यात आलाय.