Rohit Pawar l राजकारण न करता आतापासूनच...; दुष्काळाच्या परिस्थितीवर Rohit Pawar यांची X पोस्ट

भीषण दुष्काळाचं संकट महाराष्ट्राच्या दारावर उभंय. सरकारने या भीषण प्रश्नाकडं तरी राजकीय चष्मा काढून बघावं आणि कोणतंही राजकारण न करता आतापासूनच कामाला सुरवात करावी असं रोहित पवार यांनी म्हटलंय. गेल्या काही दशकातील सर्वात भीषण दुष्काळाचं संकट आज महाराष्ट्राच्या दारावर थाप देऊन उभं राहिलंय.राज्यातील काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी हवामान विभागाने केलेल्या भाकितानुसार पुढं उभा राहिलेली दुष्काळी परिस्थिती बघता पिण्याचं पाणी, चारा छावण्या आणि फळबागा वाचवण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावं, असा सल्ला रोहित पवारांनी ट्विट करुन दिलाय. Rohit Pawar's X post on the drought situation.

संबंधित व्हिडीओ