कोकणातील मंत्री,आमदारांसोबत Eknath Shinde यांची बैठक;गोगावले,राणे,दळवी,महेंद्र थोरवे बैठकीला उपस्थित

कोकणातील मंत्री, आमदारांसोबत एकनाथ शिंदे बैठक घेतायत.या बैठकीला भरत गोगावले, निलेश राणे, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे उपस्थित आहेत.कोकणातील विधान परिषदेच्या जागेसंदर्भात ही बैठक होतेय.कोकणातील जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यानंतर आपल्या आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. उद्या अनिकेत तटकरे अर्ज भरणार असल्याची माहिती आहे, यावेळी सर्वांनी उपस्थित राहा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिल्यात.तर पालकमंत्री पद भरत गोगावलेंना द्या अशी भूमिका सर्व आमदारांनी घेतलीय. त्यामुळे आता विधान परिषदेच्या बदल्यात शिंदेंची शिवसेना पालकमंत्री पदावर दावा करणार का अशी चर्चा जोर धरू लागलीय. दुसरीकडे जळगावच्या जागेसंदर्भात चर्चेसाठी गुलाबराव पाटील देखील पोहोचलेयत.

संबंधित व्हिडीओ