Mpsc च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ ही पुढे ढकलण्यात आली आहे. फक्त राज्य सेवा मुख्य परीक्षाच नाही, तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब मुख्य परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला असून, आता या परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत.
MPSC Exams Postponed | Major decision by the Maharashtra Public Service Commission; MPSC exams postponed.