एआय... म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता... जग बदलणारे तंत्रज्ञान की मानवजातीसमोरील सर्वात मोठा धोका? असा प्रश्न विचारण्यामागचं मोठं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिलेला इशारा... एआय चुकीच्या हातात गेल्यास तब्बल एक अब्ज लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते, असा गंभीर इशारा गेट्स यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, बिल गेट्स एकटेच नाहीत. एलन मस्क, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे प्रमुख डॅरिओ अमोडेई यांसारखे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजही एआयच्या अनियंत्रित विकासाबाबत चिंता व्यक्त करत आहेत. मानवाच्या प्रगतीचे साधन ठरणारे एआय भविष्यात संकटाचे कारण ठरेल का? पाहूया हा विशेष रिपोर्ट.