बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूरमध्ये एका धक्कादायक घटना समोर आलीय.. एका 21 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.. मात्र या घटनेनंतरही अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.. ज्ञानेश्वर वाकडे असे मृत तरुणाचे नाव आहे.. संतप्त कुटुंबीयांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.. आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय..