वाकोला ते बीकेसीला थेट जोडणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरच्या पुलाचं बांधकाम तर पूर्ण झालंय. मात्र हा पूल अजूनही वाहतूक सेवेत दाखल झालेला नाही. त्यामुळे या परिसरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. बीकेसीवरुन पश्चिम द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी हा 5.4 किमी लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. सांताक्रूझला या पुलाची सुरुवात होते. तिथून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॉम्प्लेक्सजवळून मिठी नदी ओलांडून हा पूल बीकेसीजवळ उतरतो. या पुलामुळे बीकेसी ते पश्चिम द्रुतगती मार्ग थेट जोडला गेलाय. मात्र पुलाचं लोकार्पण न झाल्याने सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.