Mumbai-Ahmedabad मार्गावर LPG गॅस टँकर उलटला; टँकरमधे ज्वलनशील गॅस असल्यानं खळबळ

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील सावरोली येथे ज्वलनशील LPG गॅस वाहून नेणारा टँकर उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर उलटल्याने एकच खळबळ उडाली.टँकरमध्ये ज्वलनशील LPG गॅस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.क्रेनच्या सहाय्याने टँकर हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महामार्गावर सध्या एकाच लेनमधून वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.परिस्थितीवर पोलीस आणि संबंधित यंत्रणांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांना या परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ