कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिझेरियन प्रसूतीनंतर चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे एका महिलेच्या पोटात गंभीर संसर्ग झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपांमुळे पुन्हा एकदा केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.