Karnataka| सुट्ट्या पैशांवरून कंडक्टरने मंत्र्यांनाच उतरायला सांगितलं; बायराथी सुरेश यांचा अनुभव

बसमधील तिकीट आणि सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वादांचा फटका आता थेट परिवहन मंत्र्यांनाच बसल्याचं कर्नाटकमध्ये पाहायला मिळालं आहे. सामान्य प्रवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी मास्क लावून बसने प्रवास केला. मात्र तिकीटासाठी १०० रुपयांची नोट दिल्यानंतर सुट्टे पैसे नसल्यामुळे कंडक्टरने त्यांना थेट बसमधून उतरून जाण्यास सांगितलं. कंडक्टरला समोरचा प्रवासी परिवहन मंत्री असल्याचंही ओळखता आलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित व्हिडीओ