Kalyan च्या खडकपाडा KFC मध्ये आरोग्याशी खेळ; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पावाचा साठा, कारवाईची मागणी

कल्याणच्या खडकपाडा परिसरातील केएफसी आउटलेटमध्ये अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. स्वच्छतागृहासमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावाचा साठा ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे... हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित व्हिडिओच्या आधारे अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत संबंधित दुकान तात्पुरते बंद यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आता एफडीए या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ