राज्यासह देशावर 'अल निनो'च्या संकटाचे ढग आहे.. अशातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला बरसणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली.. ऐन खरीपाच्या हंगामात पावसाने दांडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.. तर दुसरीकडे बोगस आणि निष्कृष्ट दर्जाच्या बियाणांच्या सुळसुळाटामुळे शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकाटात सापडलाय... विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोयबीनचे बियाणं पेरण्यात आलेत.. मात्र अंकूर फुटले नाहीत.. त्यामुळे या बोगस बियाणांच्या कंपन्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत... बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोल्यासह अनेक ठिकाणी शेतकरी आता हतबल झालाय.. बोगस बियाणांवर विधानसभेत बोलूनही कारवाई होत नाही, शेतकऱ्यांना आता सरकार दुबार पेरणीसाठी बियाणं मोफत देणार आहेत का? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय..