Moshi दुर्घटना प्रकरण| पालिकेकडून अँटोनी लारा रिन्युएबलला नोटीस; याचसंदर्भात आयुक्तांसोबत बातचीत

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी बातचीत केली आहे, पाहूयात

संबंधित व्हिडीओ