Shrirampur| हॉटेल व्यावसायिक हत्या प्रकरण तापलं; श्रीरामपूर बंद,पालकमंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांच्या हत्येनंतर आता नागरिक आक्रमक झालेयत.श्रीरामपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय, आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या एक तासापासून नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत आरोपीवर कारवाई नाही तोपर्यंत अंतविधी नाही.. अशी भूमिका श्रीरामपूरवासियांनी घेतलीय, सध्या पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मात्र, आरोपींवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ