Beed | माजलगाव अपघात प्रकरणात दीपक मेंडकेंचा खुलासा, माझा मुलगा गाडी चालवत नव्हता- दीपक मेंडके

बीडच्या माजलगाव मध्ये भाजप नगरसेवक दिलीप मेंडके यांच्या मुलाने मित्रांसोबत लावलेल्या रेस दरम्यान दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला. माजलगावमध्ये रेसच्या नादात झालेल्या भीषण अपघातात प्रल्हादराव गायकवाड आणि त्याच्या सुनीता गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या आई-वडिलांनी बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आई-वडिलांचे मृतदेह पाहण्याची वेळ तीन लेकरांवर आली. मात्र, आता या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप मृत दाम्पत्याच्या मुलांनी केलाय. दरम्यान या अपघातप्रकरणी भाजप नगरसेवकाने स्पष्टीकरण दिलंय.. नगरसेवकाचा मुलगा दक्ष मेंडके अल्पवयीन आहे. मात्र तो गाडी चालवत नव्हता असं दीपक मेंडके यांनी सांगितलंय.. नगरसेवकाने याबाबतचा एक पुरावाही पोलिसांकडे दिल्याचं सांगितलंय..

संबंधित व्हिडीओ