दातांच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं साहित्य किती सुरक्षित आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. कारण दातांच्या कॅप आणि ब्रिज तयार करण्यासाठी चक्क पाच रुपयांची नाणी, भंगारातील धातू आणि स्टीलचे चमचे वापरले जात असल्याच्या धक्कादायक तक्रारी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडे दाखल झाल्या आहेत...
या प्रकरणात राज्यभरातून शेकडो तक्रारी समोर आल्या असून, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जातोय..या गंभीर प्रकाराबाबत काय म्हणतायत तज्ज्ञ, पाहूया हा विशेष रिपोर्ट..