गोकुळमधील सत्तासंघर्षामध्ये वकिलांची फी चर्चेचा विषय ठरला आहे.. गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेलं न्यायालयातील प्रकरणांमध्ये महायुतीच्या वकिलांना 80 लाख रुपये सरकारी तिजोरीतीने दिल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय..गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा असा आरोप देखील यामध्ये करण्यात आलाय.