अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. चाटेच राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष पदावरून निलंबन करण्यात आलंय. चारित्र्याची पडताळणी करून नेमणुका करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कळवण्यात आलंय. त्यामुळे आत्ताची महत्वाची घडामोड म्हणावी लागेल.