बीड मधील मस्साजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मीक कराडला मोक्का लावण्यात आलेला आहे. आज वाल्मिकला पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आल्याचं करण्यात येणार असल्याचं समजतंय. हत्येचा मास्टर माइंड म्हणून वाल्मीक कराड याचं नाव घेतलं जातंय. अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींसह कराडला सुद्धा मोक्का लावल्यामुळे कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान वाल्मीक कराडचा ताबा आता सिट कडे देण्यात आलाय. तर आज वाल्मीक कराडला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे.