राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्व प्राथमिक म्हणजे प्ले स्कूल नर्सरी चालवल्या जातात मात्र त्यांची नोंदणी होत नाही. आता ही नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे अनिवार्य असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीमध्ये या संदर्भातले निर्देश दिलेत. या पूर्व प्राथमिक शाळांना नोंदणी करावीच लागेल. त्यांना हे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणं अनिवार्य असणार आहे असेही निर्देश काल देवेंद्र फडणवीसांनी जारी केलेत.