बीडच्या केजमधील विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी करण्यात येणारं उपोषण आता मागे घेण्यात आलं.रमेश घुलेंकडून सलग 17 दिवस उपोषण सुरू होतं.अँड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री सदावर्तेंच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आलं.. त्याचबरोबर आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय...याप्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी रमेश घुले यांचं उपोषण सुरू होतं.