Hingoli Rain| 15 दिवसांपासून पावसाची दडी, खरिपाच्या पिकांचं नुकसान होण्याची भीती;याचाच घेतलेला आढावा

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.पाऊस नसल्याने खरिपाच्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे, तर वाळून जाण्याच्या मार्गावर असलेली पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपडताना दिसून येत आहे. तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे शेतकरी पिकांना पाणी देत आहेत मात्र जिल्ह्यात आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पिके वाळून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.या संदर्भात आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ