महाराष्ट्रातील बळीराजाची चिंता वाढवणारी अत्यंत महत्त्वाची बातमी...हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील संपूर्ण महिनाभर राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. पिकाला अत्यंत गरज असताना पाऊस गायब होणार असल्याने बळीराजा हादरलाय. पावसाच्या या मोठ्या खंडाचा फक्त शेतीलाच नाही, तर नागरिकांनाही फटका बसणार आहे. काय आहे हवामान विभागाचा अंदाज पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.