Yavatmal जिल्ह्यात 36 हजार हेक्टरवरील पिकांना फटका, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 36 हजार 135 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीच्या पाण्यामुळे अनेक शेतांमधील उभी पिकं अक्षरशः खरडून गेली, तर काही ठिकाणी शेतातील सुपीक मातीदेखील वाहून गेली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे आणि पाहणी करण्यात आली असली, तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई कधी मिळणार, हा मोठा प्रश्न कायम आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या मदतीकडे लागले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आमचे प्रतिनिधी प्रतीक राठोड यांनी...

संबंधित व्हिडीओ