मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसलाय.. माजी महापौर आणि नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद आता रद्द करण्यात आलंय.. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं.. विशाखा राऊत यांच्याकडे आता अपीलासाठी तीन महिन्यांची मुदत आहे. विशाखा राऊत या माजी महापौर असून त्या 191 नंबरच्या वॉर्डमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांच्याविरोधात निवडून आल्या आहेत.. विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आता महापालिकेच्या सभागृहासमोर येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.. दरम्यान, विशाखा राऊत यांनी आपल्याकडे आजोबांच्या काळापासूनचे जात प्रमाणपत्र नोंदी असल्याचं सांगितलं आहे. तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निर्णय देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचंही विशाखा राऊत यांनी म्हटलंय.