किचन आणि स्टोअर रूममध्ये अस्वच्छता, छप्पन भोग थाळी Restaurant चा परवाना निलंबित | Chh.Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास रस्त्यावरील प्रसिद्ध मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात आलाय... याठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली.. या धाडीत रेस्टॉरंटच्या किचन आणि स्टोअर रूममध्ये किडे पडलेले पीठ, घाणीचे साम्राज्य आणि नियमबाह्य कारभार पाहून अधिकारीही हादरले.. यावेळी तपासणीदरम्यान रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठात जिवंत कीटक, अळ्या आणि त्यांचे अवशेष आढळले.. याशिवाय, जुना अन्नसाठा तसाच ठेवून नियमांची पायमल्ली केली जात होती... त्यामुळे आता रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ