बीडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा पार पडला आणि या मोर्चात संग्राम भंडारे यांनी चिथावणीखोर विधान केलंय.सर्व हिंदूंनी गाडीत कोयता आणि कुऱ्हाडी ठेवल्या पाहिजे, पोलिसांनी विचारलं तर सांगा हिरवळ काढायची आहे असं चिथावणीखोर विधान केलंय.या जन आक्रोश मोर्चाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते, इतकंच नाही तर हिंदू तरूणांवर हल्ला करणाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या रिअॅक्शनला पोलिस जबाबदार असतील असं देखील वादग्रस्त विधान केलंय दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्यावर पातळी सोडून संग्राम भंडारे यांनी टीका केलीय, याशिवाय प्रशासनाने धाराशिव, संभाजीनगर, अहिल्यानगरमध्ये जुन्या नावाने असणाऱ्या दुकानांची नावं न बदल्यास आम्ही बदलू असं इशारा देखील संग्राम भंडारेंनी दिलाय