संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची जी नाचक्की झाली आहे ती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले जातायत तर दुसरीकडे बीड पोलिसांच्या वागण्यावर. संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच प्रकरणातल्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळण्याचे प्रताप कमी होते म्हणून की काय? आता बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं बोगस एन्काउंटर कसं करायचं याचे धडे सोशल मीडिया वर द्यायला सुरुवात केली. धनंजय मुंडें पासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर जोरदार आरोप केले. आणि सगळ्या अंगाशी आल्यावर आता गप पोलिसांना शरण यायची तयारी केली आहे. या वशी. महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो तर कितीही टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या. मी भेटणार नाही. मी रोज दोन गाड्या चांगे करतो. इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आईएमई सगळं चांगे करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंट ने करायचा आणि मग बघायचं. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना खुलं आव्हान देणारा. वाल्मिक कराडच्या एन्काउंटर ची सुपारी मिळाल्याचा दावा करणारा आणि धनंजय मुंडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले अखेर पोलिसांना शरण येणार आहे.