Beed | दिवंगत सरपंच Santosh Deshmukh यांच्या घरात चोरी, सर्वजण झोपलेले असताना मध्यरात्री घरात चोरी

बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील मौल्यवान वस्तू काही गेल्या नाहीत मात्र कपड्यांचं कपाट तोडून अस्ताव्यस्त टाकलेले आहेत. गावातील अनेकांच्या घरी घरफोडी झाल्याचे समोर आले आहे.रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे.सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.

संबंधित व्हिडीओ