बीड तालुक्यातील डोईफोडवाडी येथे आज दुपारी शेतातील बांधाच्या वादावरून दोन गटात राडा झाला. यामध्ये तरूण ऋतुराज धनराज डोईफोडे याने काठीने स्वतःच्या चुलता आणि चुलतीला मारहाण केली. तसेच व्हिडिओ काढला तरी माझं काही वाकडं होत नाही. तुम्हाला जिवे मारतो अशी धमकी दिली. या मारहाणीत मनोहर डोईफोडे, रितेश डोईफोडे, सिंधु डोईफोडे आणि चिंगुबाई डोईफोडे चार जण जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असुन या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.