मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे.बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या भाडेवाढीसाठी आग्रह धरला होता.त्याला आता मान्यता मिळाल्यामुळे मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.