Big News|केंद्र सरकारने कांदा खरेदीचा दर वाढवला, कांदा खरेदीचा दर वाढवून 16.5 रुपये प्रति किलोवर

केंद्र सरकारने कांदा खरेदीचा दर वाढवला.. सरकार आता साडेसोळा रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करणार आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने 'बफर स्टॉक' कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीचा दर क्विंटली 1580 वरून 1650 रुपये इतका केलाय.हा नवीन दर शनिवारपासून लागू होईल.देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, लागवडीचा वाढलेला खर्च लक्षात घेता 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मागणी केलीय..

संबंधित व्हिडीओ