कल्याणमधून रहिवाशांच्या वादाची एक धक्कादायक घटना समोर आलीय.पार्किंगच्या वादावरून एका डॉक्टर कुटुंबाला गंभीर मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे. सोसायटीतील काही सदस्यांच्या सततच्या त्रासामुळे आणि धमक्यांमुळे घाबरलेल्या डॉक्टर कुटुंबाने अखेर आपले घर विकण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय.